हिंदू महिला महोत्सव

जागर नारीशक्तीचा, संकल्प समर्थ भारताचा !
कित्येक हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:|’ अर्थात ‘जिथे स्त्रीची पूजा होते तिथेच देवांचा वास असतो’ या आपल्या सांस्कृतिक मूल्याचा जागर करण्यासाठी ‘जनसेवा न्यास’ ही हडपसर येथील संस्था गेली पाच वर्षे ‘महिलांचे भव्य एकत्रीकरण’ करीत आहे. याचप्रमाणे या वर्षी ‘गुढीपाडवा’ (वर्ष प्रतिपदा शके 1947) म्हणजेच रविवार, दि. 30 मार्च, 2025 रोजी ‘हिंदू महिला महोत्सव’ या भव्य महिला एकत्रीकरणाचे आयोजन केले आहे.
“जलं हि प्राणिनः प्राणाः, जलं शस्यस्य जीवनम्” आपल्या आयुष्यातील पाण्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पुराणापासून आपल्याला सांगितले आहे. पाण्याची बचत म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा पाया ! एक स्त्रीच हे जाणू शकते आणि त्यावर उपाय योजू शकते. चला तर मग या नवीन वर्षात १०० कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करू आणि आपल्या सृष्टीचे आपण जतन करू. आपण सर्व महिलांनी या मध्ये सहभागी व्हावे ही विनंती.

( १८ वर्ष आणि त्यावरील महिलांसाठी )

"*" indicates required fields

Contact

Janaseva Nyas

Scroll to Top